द ग्रेट खली करतोय गवंडीकाम अन् तळतोय भजी...

वृत्तसंस्था
Friday, 15 May 2020

डब्ल्यूडब्ल्यूईचा बादशाह दलीपसिंग राणा उर्फ द ग्रेट खलीवर सध्या गवंडीकाम करण्याची वेळ आली आहे. गवंडीकाम करतानाचे त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कर्नाल (हरियाना): डब्ल्यूडब्ल्यूईचा बादशाह दलीपसिंग राणा उर्फ द ग्रेट खलीवर सध्या गवंडीकाम करण्याची वेळ आली आहे. गवंडीकाम करतानाचे त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Video: भूकेपोटी मजूर अक्षरशः तुटून पडले...

डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेत २००७ मध्ये वर्ल्ड हेवीवेट चँपियनशिप जिंकणारा तो पाहिला भारतीय ठरला आहे. पण, खली गवंडीकाम करत असल्याचे पाहून अनेकानी आश्चर्य व्यक्त केले आहे. खली मनापासून काम करताना दिसत असून, विटा रचून हाती ओळंबा, थापी घेतलेला खली गवंडी बनून भिंती बांधताना दिसत आहे. शिवाय, भजी तळताना, जिलबी बनविताना, लाकडे कापताना, ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने जमीन सलग करताना, झाडांची काळजी घेतानाही दिसत आहे. पण, त्यामागे वेगळे कारण आहे.

Video: या लहानग्याची काय चूक हो?

खली कर्नाल कुरुक्षेत्र सीमेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी बांधत आहे. त्यासाठी स्पर्धेतून मिळविलेला सर्व खर्च करत आहे. पण, सध्या करोना आणि लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नाहीत. पण, मजूर मिळत नसल्यामुळे त्याने काम थांबविलेले नाही. बांधकाम लवकर पूर्ण व्हावे म्हणून उपलब्ध कामगारांमध्ये तो काम करत आहे. त्यामुळे तो कधी गवंडी काम करताना दिसतो तर कधी कामगारांसाठी जेवण बनवताना, भजी तळताना दिसत आहे.

चिमुकली रडू लागताच बापाने गिळला अवंढा...

खली म्हणाला, 'कोरोनाला हरवायाचे असेल तर शरीर तंदुरुस्त हवे. मजुरांना वेळ मिळाला की कब्बडी खेळायचे प्रशिक्षण देतो. परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा ही कामे मी केली आहेत. त्यामुळे कामाची लाज वाटत नाही. देशाला पुन्हा विश्वगुरू बनविण्याचा त्याचा निर्धार आहे. करोना आज रिअल लाईफ बॉस वाटत असला तरी तो हरणार आहे. अकादमी मध्ये एक फूड कोर्ट असेल तेथे खेळाडूंच्या डाएटची काळजी घेतली जाणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the great khali become mason when not get laborers and being built coaching center