esakal | चहाच्या मळ्यात पुन्हा कमळ; कोण होणार मुख्यमंत्री?
sakal

बोलून बातमी शोधा

Sarbananda Sonowal

आसाममध्ये दुसऱ्यांदा कमळ फुलले असले तरी राज्याची धुरा कोणावर सोपवावी यावरुन दिल्लीश्‍वरात मंथन होण्याची शक्यता आहे.

चहाच्या मळ्यात पुन्हा कमळ; कोण होणार मुख्यमंत्री?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

गुवाहाटी : विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपला बहुमत मिळाले असून १२६ पैकी ७५ जागा सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात पडत असल्याचे चित्र आहे. बहुमतांचा ६४ आकडा भाजपने दुपारीच मतमोजणीत गाठला. कॉंग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष दुसऱ्या स्थानावर असून ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याची स्थिती आहे. विधानसभा निकालाचे ट्रेंड पाहता आसाममध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे. आसामच्या दणदणीत विजयाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले?

सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षाने ५७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यास सुरवात केली. गुवाहाटी येथील पक्ष कार्यालयात मिठाई वाटण्यात आली. कॉंग्रेसने मात्र पराभव मान्य करत विरोधी पक्षाची सक्षम आघाडी करू, असे म्हटले आहे. सत्ताधारी भाजप महाआघाडी ७५ जागांवर पुढे असून त्यात भाजप ५५ आणि घटक पक्ष आसाम गण परिषद ११ आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाने ८ जागांवर आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसने २८जागांवर आघाडी घेतली असून त्याचे घटक पक्ष एआययूडीएफ १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट २ जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा: केरळमध्ये डाव्यांवर पुन्हा विश्‍वास; भाजप पुन्हा निष्प्रभ

दरम्यान, आसाममध्ये दुसऱ्यांदा कमळ फुलले असले तरी राज्याची धुरा कोणावर सोपवावी यावरुन दिल्लीश्‍वरात मंथन होण्याची शक्यता आहे. सोनोवाल यांच्याबरोबरच हेमंत बिस्व सरमा, दिलीप सैकिया यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे निवड करताना सर्वच घटकांचा विचार करावा लागणार आहे.

loading image
go to top