आसामच्या मुख्यमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत तब्बल १८ तास बैठक

१८ तासांच्या या बैठकीची देशभरात चर्चा सुरू आहे.
Assam CM
Assam CMTeam eSakal

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा (CM Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हेमंत बिस्वा यांनी काल राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या चर्चेचं कारण म्हणजे या बैठकीची वेळ आहे. मुख्यमंत्र्यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल १८ तासांची बैठक घेतली आहे. याबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की, असं वातावरण तयार करा की, पुढील दोन-तीन वर्षांनंतर कुणाला वैयक्तिक संरक्षणाची आवश्यकताच पडू नये.

Assam CM
"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त"

काल सकाळी 10.30 वाजता सुरू झालेल्या पोलीस अधिक्षकांच्या परिषदेचा पहिला दिवस आज पहाटे 4 वाजता संपला. ही 18 तासांची मॅरेथॉन बैठक होती, ज्यामध्ये पोलीस अधिक्षक आणि उप अधीक्षकांना तपशीलवार सादरीकरण केलं असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी स्वत: सांगितलं.

Assam CM
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर आणि त्रिपुरामध्ये क विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान इंफाळमध्ये 4,800 कोटी रुपयांचे 22 प्रकल्प लॉन्च करणार आहेत. आगरतळा येथे ते महाराजा वीर विक्रम विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटन करतील आणि दोन महत्त्वाच्या विकास योजनांचा शुभारंभ करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com