आसाममध्ये पुराचा कहर, आतापर्यंत 24 मृत्यू तर 7 लाखहून जास्त बाधित

Assam floods more than 7 lakh people affected 24 dead
Assam floods more than 7 lakh people affected 24 dead
Updated on

Assam floods : अद्याप देखील आसाममधील 22 जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. या जिल्ह्यांतील सुमारे 7.20 लाख लोकांना या पुराचा फटका बसला असून आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDAMA) ने सांगितले की, पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत किमान 24 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ASDMA ने रविवारी सांगितले की, 91,518 बाधित लोक सध्या राज्यभरातील 269 मदत शिबिरांमध्ये राहत आहेत. प्रशासनाने 152 मदत वितरण केंद्रेही स्थापन केली आहेत. एएसडीएमएने पुढे सांगितले की, भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्वयंसेवकांच्या मदतीने पुरात अडकलेल्या सुमारे 26,236 लोकांची सुटका करण्यात आली आहे.

Assam floods more than 7 lakh people affected 24 dead
उमरानला इतके प्रेम दिल्याबद्दल देशाचा आभारी, वडिलांची भावूक प्रतिक्रिया

बारपेटा, विश्वनाथ, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजई, जोरहाट, कामरूप, कामरूप (एम), कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी या जिल्ह्यांमध्ये पुरामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आसाममध्ये किमान 20 बांध वाहून गेले आहेत आणि अनेक पूल देखील वाहून गेले किंवा खराब झाले आहेत. अनेक रस्ते खराब झाले आहेत, तर 2,251 पूरप्रवण गावांमधील 43,090 घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे.

Assam floods more than 7 lakh people affected 24 dead
"लाथ मारा अशा खासदारकीला"; निलेश राणेंचं संभाजीराजेंंना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com