दलाई लामांना चीनपासून वाचवणारे आसाम रायफल्सचे नरेन दास यांचं निधन

दलाई लामांना चीनपासून वाचवणारे आसाम रायफल्सचे नरेन दास यांचं निधन
Summary

२०१७ मध्ये जेव्हा नरेन दास समोर आले तेव्हा दलाई लामा यांनी ५० वर्षांपूर्वीच्या त्या गोष्टीबद्दल सॅल्युट केला होता.

आसाम रायफल्समधून निवृत्त झालेले जवान नरेन चंद्र दास यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. नरेन चंद्र दास यांनी १९५९ मध्ये १४ व्या दलाई लामांना वाचवलं होतं. तिबेटमधून वाचवून त्यांना भारतात आणलं होतं.

१९५९ मध्ये चीनी लष्कराने ल्हासामध्ये तिबेटसाठी सुरु असलेला संघर्ष दाबण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांना चिनी लष्कर पडकण्याची शक्यता होती. यापासून वाचण्यासाठी दलाई लामा यांना तिबेटमधून निघणं आवश्यक होतं. मात्र परिसरात चिनी सैनिक असल्यानं दलाई लामांना बाहेर पडणं कठीण होतं.

अरुणाचल प्रदेशातील सीमेवर नरेन चंद्र दास हे १९५९ मध्ये तैनात होते. त्यांना दलाई लामांना तिबेटच्या सीमेवरून भारतात सुरक्षित आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दास यांनी त्यांच्या चार सहकाऱ्यांसह दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांना तिबेटमधून निघण्यास मदत केली. सर्वांना सुरक्षितपणे तवांगना आणलं होतं. दास हे त्यावेळी २२ वर्षांचे होते तर दलाई लामा यांचे वय २३ इतकं होतं.

२०१७ मध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रह्मपुत्र कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी नरेन चंद्र दास यांची दलाई लामांशी भेट झाली होती. नरेन चंद्र दास यांना पाहताच दलाई लामा यांनी सॅल्युट केला होता. यावेळी आजुबाजुचे लोकही चकीत झाले होते. धर्मगुरुला लोक नमस्कार करतात आणि तेच धर्मगुरु एका वृद्ध व्यक्तीला का सॅल्युट करतायत असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यानंतर नरेन चंद्र यांची गळाभेटही दलाई लामा यांनी घेत आभार मानले होते.

तिबेटवर चीनने आक्रमण केल्यानंतर दलाई लामा हे भारतात आले होते. दलाई लामा हे निर्वासित म्हणून भारतात राहतात. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं ते राहतात. धर्मशाला आज तिबेटच्या राजकारणाचं केंद्र बनलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com