ही तर लोकशाहीची हत्या! राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीनंतर विरोधकांची प्रतिक्रिया

derec oberoi
derec oberoi

नवी दिल्ली: राज्यसभेत विरोधी खासदारांचा मोठा गदारोळ असतानाही सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. आवाजी मतदानाने ही बिलं पास होण्यापूर्वीही या विधेयकांवर सभागृहात मोठा गोंधळ झाला. घोषणाबाजी करत विरोधी पक्षातील खासदार वेलमध्ये आले होते. विरोधकांनी आजच्या दिवसाला 'काळा दिवस' असं म्हटलं आहे. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन या भाजपाच्या कृतीला 'लोकशाहीची हत्या' असं म्हणाले आहेत.

विरोधी खासदारांकडून घोषणा-
उपसभापती हरिवंश यांनी कृषी विधेयकं आवाजी मतदानाने पास केल्यावर खासदारांनी सभागृहात एकच गदारोळ उडाला. ही बिले निवड समितीकडे पाठविण्याच्या प्रस्तावावर मत मागण्याची मागणी केली जात होती. तृणमूल कॉंग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. हा गोंधळ इतका तीव्र झाला की राज्यसभेतील मार्शलला यात हस्तक्षेप करावा लागला. विरोधी सदस्यांनी विधेयकाचे तुकडे हवेमध्ये फेकले. उपसभापतींसमोर माईकदेखील तोडण्यात आला.  सभागृहाचे कामकाज काही काळ थांबवावे लागले. पुन्हा कारवाई सुरू झाल्यानंतरही हा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर आता राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 पर्यंत तहकूब केलं आहे.

 विरोधकांनी 'काळा दिवस' म्हटलं-
 राज्यसभेत गदारोळाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक मंजूर करण्याबाबत विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "बाहुबली मोदी सरकारने जबरदस्तीने किसान विधेयक मंजूर केले. यापेक्षा अंधकारमय दिवस काहीही असू शकत नाही. देशातील शेतकरी मोदी सरकारला कधीच माफ करणार नाहीत." त्याच वेळी डेरेक ओब्रायन म्हणाले की, "त्यांनी फसवणूक केली. संसदेत त्यांनी प्रत्येक नियम मोडला. सर्वात वाईट मार्गाने तो ऐतिहासिक दिवस होता. देश पाहू शकत नाही म्हणून राज्यसभा टीव्हीचा फी त्यांनी कापला. त्यांनी आरएसटीव्हीवर सेन्सॉर केले."  पूर्ण झाले. आमच्याकडे पुरावे आहेत. "  राज्यसभा बाहेर पडताच त्याने व्हिडिओ व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला. 

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि एकही आत्महत्या होणार नाही याची खात्री देणार का? राऊतांचा सवाल
 

 विरोधकांनी भाजपला शेतकरीविरोधी म्हटलं-
कृषी विधेयक मंजूर झाल्यावर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या 70 वर्षांच्या अन्यायातून शेतकऱ्यांना मुक्त केलं आहे. राज्यसभेतील गदारोळाबद्दल नड्डा म्हणाले, "विरोधी पक्ष शेतकरीविरोधी आहेत. या प्रक्रियेत भाग घेण्याऐवजी त्यांनी शेतकर्‍यांची मुक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. भाजप विरोधकांचा या कृत्याचं निषेध करते."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com