Assembly Election Exit Polls: एक्झिट पोल की आकड्यांचा झोल? ३ डिसेंबरला पोलखोल!

Assembly Election Exit Polls
Assembly Election Exit Polls

Assembly Election Exit Polls:  लोकसभेची मिनी निवडणूक म्हणून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहले जात आहे. पाचही राज्यात मतदान झाले असून ३ डिसेंबरला अंतिम निर्णय होणार आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीगड आणि मिझोराममध्ये सर्व राजकीय पक्ष आपलं नशिब आजमावणार आहे.

मात्र यापूर्वी सर्व राज्यामंधील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. कोणावर विश्वास ठेवावा, असा पेच सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. सर्व राजकीय पक्ष त्यांची सोयीनुसार एक्झिट पोल अंदाज लावतात. अनेकवेळा निकाल एक्झिट पोलच्या विरोधात देखील असतात.

एक्झिट पोल देणाऱ्या संस्था प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करत असल्याचा दावा करतात. सर्वांनी एकाच निवडणुकीतील डेटा गोळा केला आहे. एक्झिट पोलच्या व्याख्येनुसार, मतदारांचे सर्वेक्षण त्या वेळी केले जाते जेव्हा ते मतदान केल्यानंतर बाहेर पडतात. म्हणजे वेळही जवळपास सारखीच आहे. पण नुकत्याच जाहीर झालेले आकडे वेगळेच ट्रेंड दाखवत आहेत. (Latest Marathi News)

4 सर्वेक्षणे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार स्थापनेचे संकेत देत आहेत, तर 5 सर्वेक्षणांमध्ये थोडासा कल काँग्रेसकडे आहे. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा एक्झिट पोल डेटा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विश्वास कुणावर ठेवावा, असा प्रश्न मतदारांपुढे निर्माण झाला आहे.

एक्झिट पोल म्हणजे निकाल नाहीत हे आधी लक्षाते घेतले पाहीजे. याचा कोणत्याही पक्षावर देखील परिणाम होत नाही. मात्र खरा निकाल येईपर्यंत एक्झिट पोल चर्तेत असतात. विविध मार्गांनी एक्झिट पोल मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांमुळे नवीन लोकशाही सरकार निवडण्याच्या गंभीर प्रक्रियेला आकडेवारीच्या नावाखाली करमणुकीच्या कार्यक्रमात रूपांतरित केले आहे का?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

Assembly Election Exit Polls
Rajastan Election: सत्तास्थापनेसाठी ‘फिल्डिंग’ ; गेहलोत अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात?

एक्झिट पोलचे वेगळेच ट्रेंड -

तेलंगणात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सरकार आहे. एमएनएफचे झोरामथांगा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे के. चंद्रशेखर राव तेलंगणात सत्तेवर आहेत.

Assembly Election Exit Polls
MP Election Result : काँग्रेसचं मध्य प्रदेशात काय होणार? दिग्विजय सिंह यांनी सांगितला त्यांचा एक्झिट पोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com