cVIGIL अ‍ॅप काय आहे? निवडणूक गैरप्रकारांची कशी कराल तक्रार?

निवडणूक आयोगानं शनिवारी पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली
cVIGIL
cVIGIL

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी शनिवारी पाच राज्यातील आगामी निवडणूकांची घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पार पडाव्यात यासाठी यंदा cVIGIL नावाच्या मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार असल्याचं सांगितलं. cVIGIL म्हणजे सतर्क नागरिक, भारतात Android मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार आणि आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना cVIGIL अॅपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येणार आहेत. तक्रारीनंतर 100 मिनिटांत निवडणूक आयोग यावर कारवाई करेल, असं चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

cVIGIL
पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; सात टप्प्यांमध्ये होणार मतदान

एखाद्या गैरप्रकाराचा फोटो किंवा व्हिडिओ घेऊन आदर्श आचारसंहितेच्या कोणत्याही उल्लंघनाची तक्रार करण्याची परवानगी cVIGIL अॅप तुम्हाला देतो. याचा अर्थ तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांकडे धाव न घेता गैरवर्तणुकीच्या घटनांची त्वरित मोबाईलद्वारे तक्रार करू शकता. आपली ओळख उघड होऊ नये यासाठी निनावी पद्धतीनंही या अॅपवर तुम्हाला लॉग इन करता येईल. तसेच तुम्ही केलेल्या तक्रारीची स्थिती पाहण्यासाठीही हे अॅप तुम्हाला मदत करते.

cVIGIL
युपीमध्ये निवडणुका जाहीर होताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात

cVIGIL अॅप कसं वापरावं?

या अॅपमध्ये लॉगिन प्रक्रियेत तुम्ही एकतर निनावीपणे किंवा तुमच्या मोबाइल नंबरद्वारे लॉग इन करू शकता. पण, जर तुम्ही निनावी वापरकर्ता म्हणून तक्रार दाखल केली तर तुम्हाला यामधील स्टेट्स अपडेट्स मिळणार नाहीत. एकदा लॉग इन केल्यानंतर, तुम्ही फोटो क्लिक करू शकता किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता (2 मिनिटांपर्यंत) आणि जीपीएसद्वारे डिजिटल पुरावा म्हणून सबमिट करू शकता.

तुम्ही केलेल्या तक्रारीचा मागोवा कसा घ्यालं?

cVIGIL अॅपवर तक्रार यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट्स ट्रॅक करण्यासाठी आणि मिळवण्यासाठी एक आयडी मिळेल. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक गैरप्रकारांविरोधात तक्रार करू शकता आणि प्रत्येक तक्रारीसाठी, तुम्हाला एक वेगळा ट्रॅकिंग आयडी मिळेल, ज्या द्वारे या तक्रारींवर कार्यवाही झाली की नाही हे तुम्हाला तपासता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com