Assembly Elections 2022 : कोरोना संकटात रॅली, सभांना परवानगी मिळणार? आज होणार निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political Party
कोरोना संकटात रॅली, सभांना परवानगी मिळणार? आज होणार निर्णय

कोरोना संकटात रॅली, सभांना परवानगी मिळणार? आज होणार निर्णय

उत्तर प्रदेशमध्ये, पंजाब, उत्तराखंड, मणिपुर आणि गोवा या पाच राज्यांत निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. येत्या काळात या राज्यांत विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र या निडणुकांमध्ये कोरोनाचंही निवडणूक आयोगासमोर आव्हान(Election Commission of India) आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निवडणून आयोग महत्वाचा निर्णय जाहीर करणार आहे.

हेही वाचा: Assembly Elections 2022 : कधी, कुठे, कशा होतील निवडणुका? वाचा सविस्तर

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संसर्गांच्या पार्श्वभूमिवर निवडणुका होणाऱ्या सर्व राज्यांत सभा आणि रॅलीला बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने १५ जानेवारी म्हणजेच आजपर्यंत सर्व सभा, रॅली, पदयात्रा, नुक्कड बैठकांवर बंदी घातली होती. त्यामुळे आज याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची वाढीवर हा निर्णय अवलंबून असणार आहे.

पाच राज्यांतील कोरोनाची परिस्थिती काय?

 • उत्तर प्रदेश

  गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्गाचे 16,016 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाचे एकूण 84,440 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 82,412 लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत.

 • पंजाब

  पंजाबमधील शुक्रवारी 7,642 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. एकूण आकडेवारी 6,49,736 वर पोहोचली.

 • उत्तराखंड

  उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 3200 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 7438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

 • गोवा

  गोव्यात काल दिवसभरात तब्बल 3145 रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधित होण्याचा दर देशात सगळ्यात जास्त म्हणजे 39 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

एकुणच ही सर्व राज्य आणि मणिपुरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करून अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम देखील जोरात सूरू आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid19
loading image
go to top