esakal | विरोधकाला विजयी करा म्हणून केलं होतं आवाहन; वाजपेयींचं डिपॉझिट झालं होतं जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

vajpeyi

वाजपेयी बलरामपूरमध्ये विजयी झाले आणि मथुरेत त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती. एका क्रांतिकारकाला विजयी करण्यासाठी त्यांनी स्वत:चा पराभव पदरी पाडून घेतला होता.

विरोधकाला विजयी करा म्हणून केलं होतं आवाहन; वाजपेयींचं डिपॉझिट झालं होतं जप्त

sakal_logo
By
migrator

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. विरोधकांचे मन जिंकण्याच्या त्यांच्या अनेक गोष्टींची चर्चा होत असते. त्यांनी विरोधकांना कधी कधी इतकी चांगली वागणूक दिली की अनेकदा प्रश्न पडायचा की कोणी असंही वागू शकतं का? लोकसभा निवडणुकीतला त्यांचा असाच एक किस्सा प्रसिद्ध आहे.

अटल बिहारी वाजपेयींनी त्यांची पहिली लोकसभेची निवडणूक 1957 मध्ये लढली होती. दोन मतदारसंघातून त्यांनी भारतीय जनसंघ पार्टीकडून अर्ज भरला होता. यातील पहिली निवडणूक त्यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि मथुरा या मतदारसंघामधून लढवली होती. 

मथुरेत एका प्रचारसभेवेळी त्यांनी चक्क विरोधक उमेदवाराला मत द्या असा प्रचार केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा त्यांच्या विरोधात राजा महेंद्र प्रताप सिंह हे निवडणूक लढत होते. मुरसान (हाथरस) संस्थानचे राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी पहिली लोकसभा निवडणूक 1952 मध्ये मथुरेतून लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्राध्यापक किशन चंद हे होते. यात राजा महेंद्र प्रताप यांचा पराभव झाला होता.

हे वाचा - दूरदर्शी नेतृत्वाने देशाला नेलं अभूतपूर्व उंचीवर; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त PM मोदींनी केलं नमन

राजा महेंद्र प्रताप हे एक क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तेव्हा राजा महेंद्र प्रताप यांच्या पराभवानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं की, आज एका क्रांतिकारकाचा पराभव झाला. राजा महेंद्र प्रताप यांच्या पराभवानंतर वाजपेयींनी लोकसभेत या क्रांतिकारकाला पाहण्याची इच्छा आहे असं म्हटलं होतं. योगायोगाने 1957 च्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयींच्या विरोधात अपक्ष म्हणून राजा महेंद्र प्रताप हेच होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी 9 कोटी खात्यावर पाठवणार 2 हजार रुपये

मथुरेतील गांधी पार्कमधील सभेत वाजपेयींनी म्हटलं की, मथुरेतील लोकांनो तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करत आहात तसंच प्रमे मला बलरामपूर इथंही मिळत आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही राजा महेंद्र प्रताप यांना विजयी करा. माझी काळजी करू नका. देवाला वाटत असेल तर मी बलरामपूरमध्ये जिंकेन. विशेष म्हणजे वाजपेयी बलरामपूरमध्ये विजयी झाले आणि मथुरेत त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती. एका क्रांतिकारकाला विजयी करण्यासाठी त्यांनी स्वत:चा पराभव पदरी पाडून घेतला होता. 

loading image