Atik Ahmad Case : दिल्लीचा नेता, पुण्यात अबू सालेम; अतिक अहमदच्या एन्काऊंटर झालेल्या मुलाचं कनेक्शन समोर

उमेश पाल मर्डर केसमध्ये फरार झालेल्या असदला उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये मारलं.
Asad Ahmed_Atik Ahmed
Asad Ahmed_Atik AhmedSakal

उमेश पालच्या हत्येनंतर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ असद आणि शूटर गुलाम याच्या वाचवण्याच्या प्रयत्नात होते. अतिकचा भाऊ अशरफ जेलमधूनच फेसटाईमच्या माध्यमातून शूटर्सच्या संपर्कात होते. त्यांना कुठे जायचं आहे, कुठे थांबायचं आहे, याचे निर्देशही देत होता.

महाराष्ट्रात लपण्यासाठी गँगस्टर अबू सालेमच्या निकटवर्तीयांची मदत त्यांनी घेतल्याचंही आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असदला दिल्लीमध्ये लपण्यासाठी एका नेत्याने मदत केली होती.

Asad Ahmed_Atik Ahmed
Sanjay Raut : "विरोधकांचं ऐक्य होणार नाही हा सत्ताधाऱ्यांचा भ्रम; ४८ पैकी ४० जागा जिंकणार"

आजतकने पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे. या माहितीनुसार, अतिकने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. उमेश पाल हत्याकांडानंतर असद आणि गुलाम आधी प्रयागराजहून कानपूरला गेले. त्यानंतर ते बसने नोएडाला गेले. असद शिकत असताना अनेकदा नोएडामध्ये राहिलेला होता. आता पुन्हा एकदा तो तिथे राहिला.

पण जेव्हा त्याला वाटलं की पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात, तेव्हा तो दिल्लीला गेला. इथल्या एका नेत्याने दिल्लीतल्या संगम विहार भागात त्याच्या राहण्याची सोय केली. जेव्हा दोघांना पैशांची गरज पडली तेव्हा शाईस्ताने मेरठमधल्या अखलाक याला तिथे पाठवलं. दोघे १४ मार्चपर्यंत दिल्लीमध्ये राहिले आणि त्यानंतर अजमेरला गेले.

Asad Ahmed_Atik Ahmed
High Court: "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण आंबेडकर जयंती व धार्मिक सण एकत्र साजरे करू शकत नाही?"

त्यानंतर अशरफने बरेली जेलमध्ये फेसटाईम करत अचानक असदला नाशिकला जायला सांगितलं. नाशिकमधून असद आणि गुलाम पुण्यात पोहोचले. तिथे अबू सालेमच्या निकटवर्तीयांनी दोघांच्या राहण्याची सोय केली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस या दोघांचा कसून तपास करत होते. त्यानंतर दोघेही दिल्लीला परतले आणि अचानक झाशीला गेले.

असद आणि गुलाम त्यांना पावर प्लांटजवळ गुड्डू मुस्लिम याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे राहिले. इथं गुड्डू आधी येऊन राहिला होता. इथूनच अतिकला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गुड्डू मुस्लिम सध्या फरार आहे. उमेश पालच्या हत्येनंतर सगळे शूटर्स फेसटाईम आणि व्हॉटसपच्या माध्यमातून बोलत होते. एवढंच नव्हे तर अशरफ बरेली जेलच्या सगळ्या शूटर्सला पळून जाण्याचे मार्ग आणि आयडिया सांगत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com