PFI प्रकरणात आता बाबरी मशिदीची एन्ट्री; ATSची खळबळजनक माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI

PFI प्रकरणात आता बाबरी मशिदीची एन्ट्री; ATSची खळबळजनक माहिती

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना NIA आणि ATS ने अटक केल्यानंतर आता तपासातून नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. 'बाबरी मशिद नही भुलेंगे' असा आशय लिहिलेले साहित्य अटक केलेल्या कार्यकर्त्यांकडे सापडल्याचं ATSने सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता बाबरी मशिदीची एन्ट्री झाली आहे.

(PFI Enquiry Latest Updates)

दरम्यान, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून पकडण्यात आलेल्या PFI कार्यकर्त्यांच्या तपासातून दहशतवाद्यांचे कनेक्शन उघडे पडले आहे. शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे शिक्षण देण्यात येत असल्याची माहिती ATS तपासातून समोर आली आहे. त्याचबरोबर PFIच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून व्यवहार झाल्याचा दावा ATS ने न्यायालयात केला तर दिवसेंदिवस नवीन खुलासे होऊ लागल्याने PFIचे पितळ उघडं पडू लागलं आहे.

हेही वाचा: Bhopal : भू-समाधी घेतलेले बाबा पुरूषोत्तमानंद 72 तासानंतर बाहेर; भाविकांची गर्दी

PFIचे दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली होती. तसेच PFIच्या ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली आहे. या बंदीनंतर अनेक मुस्लीम कार्यकर्ते आणि संस्थांनी विरोध केला. पाकिस्ताननेही PFIची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे PFIचे प्रकरण?

टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांच्या संशयातून NIAने PFIच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट असून भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्यांच्या टार्गेटवर असल्याचं तपासून समोर आलं आहे.

टॅग्स :PakistanTerroristNIAATS