किंचित’महागाईवर बारकाईने लक्ष; भागवत कराड

डॉ. भागवत कराड : युक्रेन-रशिया युद्धाचाही परिणाम
attention inflation Bhagwat Karad Consequences Ukraine Russia War
attention inflation Bhagwat Karad Consequences Ukraine Russia Warभागवत कराड

नवी दिल्ली : देशात महागाई किंचित वाढत असली, तरी अर्थ मंत्रालय त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा भारतातही परिणाम होत आहे, पण केंद्र सरकार महागाई शक्य तेवढी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. डॉ. कराड आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मोदी सरकारकडून भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सर्वसमावेश आणि बळकटीकरणासाठी सातत्याने उचलण्यात येत असलेल्या विविध पावलांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

डॉ. कराड यांनी कोविडच्या कालखंडाचा उल्लेख करताना सांगितले की, कोविडच्या काळात सरकारला दोनदा लॉकडाउन लागू करावे लागले होते. मात्र त्या संकटाच्या काळातही केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून गरीब आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना, लघु आणि मध्यम उद्योगांना पूर्ण मदत करण्यात आली आणि त्यामुळेच आज भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक समावेशासाठी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले जात आहे. त्याचा फायदा गरीब-मागास, तरुण आणि महिला वर्गासह देशातील प्रत्येक भागाला होईल.

सय्यद जफर इस्लाम म्हणाले, "पेट्रोलियम उत्पादनांसह अनेक वस्तूंच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नसते. जगभर महागाई वाढत असून, इतर देशांशी तुलना केल्यास भारतातील महागाईचा दर त कमी आहे. मात्र, यासोबतच समाजातील गरीब घटकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना राबवत आहे.

शेजारी देशांचा संदर्भ

शेजारी देशांच्या स्थितीचा संदर्भ देत इस्लाम म्हणाले की, आर्थिक संकटामुळे भारताच्या शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका आणि इतर देशांतील लोक त्रस्त आहेत. परंतु या काळातही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे. आर्थिक विकासाचा दर आठ टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. जन-धन योजना, पंतप्रधान विमा योजना, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वानिधी योजना, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि मनरेगा योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना, विशेषतः गरीब, दलित, मागास, अल्पसंख्याक, तरुण आणि महिलांना मिळाला आहे, असा दावा या दोघांनी यावेळी आकडेवारी देत केला.photo

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com