CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Price Hike

CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली

देशात गॅस कंपन्यांनी सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने आता सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात गॅसच्या किमती ५०-६० टक्क्यांनी वाढल्या आहे. त्यामुळे आता कारची विक्री आणि बुकिंग १०-१५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ही परिस्थिती बघता आता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली आहे. (CNG Price Hike)

सीएनजीच्या वाहनाच्या विक्रीत झाली मोठी घट

ETIGच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यापासून सीएनजी वाहनांच्या विक्रीमध्ये सतत घट होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचं मोठं कारण म्हणजे वाढलेले गाड्यांचे दर.

सीएनजीच्या दरात वाढ होण्यचे हे आहे कारण

पेट्रोल डिझेल वाहनांच्या खरेदीवर सूट मिळाल्याने आणि सीएनजी कार 80,000 ते 90,000 रुपयांनी महाग झाल्यामुळे या कारची मागणी कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, जुलै 2022 मध्ये सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा उद्योगाच्या एकूण वाहन विक्रीपैकी 12% होता. देशात विकल्या जाणार्‍या सीएनजी प्रवासी वाहनांपैकी सुमारे 85% वाहने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विकली जातात. त्यामुळे या भागातील शोरूम्सलाही याचा मोठा फटका बसून त्यांचा उद्योग ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: Auto Companies Are In Stress Big Declinein Sales Of Cng Vehicles Demand Of Auto Companies To The Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..