
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे Axiom - 4 मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं. स्टॅटिक फायर चाचणीनंतर बूस्टर तपासणीवेळी लिक्विड ऑक्सिजन लीक झाल्यानं मोहिमेला ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेंतर्गत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनाही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात येणार होतं.