प्रभू रामाशिवाय अयोध्येला अर्थ नाही

राष्ट्रपतींचे प्रतिपादन; मंदिर उभारणीची पाहणी
desh
deshsakal

लखनौ : प्रभू रामाचे अयोध्येत चिरंतन अस्तित्व आहे. रामाशिवाय अयोध्येला काहीही अर्थ नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. अयोध्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज रामलल्लाचे दर्शन घेत मंदिराच्या बांधकामस्थळाला भेट देत पाहणी केली. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज ‘रामायण परिषदे’चे उद्‌घाटन झाले. यावेळी कोविंद म्हणाले, ‘‘प्रभू रामाशिवाय अयोध्या ही अयोध्या नाहीच. जिथे राम आहे, तिथेच अयोध्येचे अस्तित्व आहे. या शहरात रामाचे चिरंतन अस्तित्व आहे, म्हणूनच ही जागा खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. अयोध्या शब्दाचा अर्थ म्हणजे जिच्याविरोधात युद्ध पुकारणे अशक्य आहे. रघु, दिलीप, अज, दशरथ आणि श्रीराम यांच्यासारख्या रघुवंशी राजांच्या पराक्रमामुळे त्यांची ही राजधानी अजिंक्य होती. त्यामुळेच अयोध्या हे नाव रूढ झाले.’’ केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयामार्फत सुरू होणाऱ्या काही प्रकल्पांचेही राष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन झाले. राष्ट्रपतींना यावेळी प्रस्तावित मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर अयोध्येला भेट देणारे कोविंद हे पहिलेच राष्ट्रपती आहेत. (National News)

उत्तर प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रपती कोविंद हे आजच्या अखेरच्या दिवशी लखनौवरून रेल्वेने अयोध्येला आले. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रपती प्रथमच अयोध्येला आले होते. रामायण परिषदेच्या उद्‌घाटनापूर्वी त्यांनी राम मंदिराच्या बांधकामस्थळाला भेट दिली आणि तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच हनुमानगढी येथेही जाऊन दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रपतींचे कुटुंबीय, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर काही मंत्री उपस्थित होते.

desh
SC चा निकाल येत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात- भुजबळ

राष्ट्रपती म्हणाले...

  1. प्रभू रामाचे आदिवासी समाजावर प्रेम होते

  2. रामचरितमानस ग्रंथाने अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि ज्ञान दिले

  3. रामकथेचा अनेक देशांमध्ये प्रसार

  4. महात्मा गांधींनीही प्रभू रामाचाच आदर्श समोर ठेवला होता.

  5. गांधीजींच्या डोळ्यासमोर भारतासाठी ‘रामराज्या’चीच संकल्पना होती.

desh
अल्पवयीन मुलाला दिली कोरोनाची लस, आजारी पडल्यावर दिले चौकशीचे आदेश

आपण प्रत्येकामध्ये राम आणि सीतेचा शोध घ्यायला हवा. राम सर्वांचा आहे आणि सर्वांमध्ये राम आहे. माझ्या पालकांनी ज्यावेळी माझे नामकरण केले, त्यावेळी कदाचित त्यांच्याही मनात प्रभू रामाबद्दल आणि रामकथेबद्दल प्रेम असावे.

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com