अल्पवयीन मुलाला दिली कोरोनाची लस, आजारी पडल्यावर दिले चौकशीचे आदेश

vaccine for child
vaccine for child

मोरेना : एका अल्पवयीन मुलाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लस घेतल्यानंतर तो मुलगा आजारी पडला आहे. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

vaccine for child
सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्याने मिळवला पहिला मान

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्‍ह्यातील अंबा तालुक्यातील बाग का पुरा येथे ही घटना घडली आहे. भारतात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. तरीही अल्पवयीन मुलाला लस देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या मुलावर आता ग्वाल्हेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कमलेश कुशवाह यांचा मुलगा पिल्लूला शनिवारी मोरेना पासून ३५ किलोमीटरवरील एका लसीकरण केंद्रात लस देण्यात आली. त्यानंतर त्याचं डोके दुखू लागले आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला.

vaccine for child
ईडीच्या नोटिशीनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अंबामधील डॉक्टरांनी या मुलाला उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवलं आहे. तर “पिल्लू नावाचा हा मुलगा उपचारासाठी ग्वाल्हेरला पोहोचला की नाही हे आम्ही तपासत आहोत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, तो ग्वाल्हेरला जाण्याऐवजी आपल्या घरी परतला आहे,” असे मोरेना जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. ए. डी. शर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. तसेच आज सकाळी पिल्लूच्या घरी एक पथक पाठविण्यात आले. त्याला फेफरे येण्याचा त्रास आहे का याची माहिती घेत असल्याचेही असे डॉ. शर्मांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com