esakal | अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन तर, ट्विटरवर 'रिटर्न बाबरी लँड टू मुस्लिम' ट्रेंड; वाचा महत्त्वाचे 7 अपडेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya ram mandir bhumi pujan 7 important updates

कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्यामुळं राम भक्तांच्या उत्साहावर पाणी पसरलं आहे. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीतही अनेकठिकाणी मिठाई, पेढे वाटप होत आहे. 

अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन तर, ट्विटरवर 'रिटर्न बाबरी लँड टू मुस्लिम' ट्रेंड; वाचा महत्त्वाचे 7 अपडेट्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : अयोध्येत आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, हा सोहळा पार पडत असून, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान रामलल्लापुढे नतमस्तक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सकाळी साडे अकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. विशेष हेलिकॉप्टरने आलेल्या पंतप्रधान मोदींचे स्वागत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढी येथे जाऊन पूजा केली त्यानंतर, त्यांनी रामलल्ला मंदिराला भेट देऊन रामाचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी रामाला साष्टांग नमस्कार केला. 

ट्विटरवर वेगवेगळे ट्रेंड
राम मंदिराचा भूमीपूजन सोहळ्या सुरू असतानात सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड सुरू होते यात, #ReturnBabrilandtoMuslimsयासह #DhanyawadBalasaheb असा ट्रेंडही सुरू होता. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज सकाळी ट्विट करून, बाबरी मशीद होती. आहे आणि राहील. असं ट्विट केलंय. 

देशभरात उत्साह
देशभरात अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असून, मिठाई आणि प्रसादाचे वाटप. पाटण्यात महावीर ट्रस्टच्या वतीने 1 लाख रघुपती लाडू वाटण्याची तयारी. कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्यामुळं राम भक्तांच्या उत्साहावर पाणी पसरलं आहे. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीतही अनेकठिकाणी मिठाई, पेढे वाटप होत आहे. 

मोहन भागवत प्रमुख पाहुणे
राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते. भूमीपूजन सोहळ्यापूर्वी झालेल्या पूजेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित होते. या सोहोळ्याला 
महंत नित्या गोपालदास यांचीही विशेष उपस्थिती होती. 

आणखी वाचा - रामायणातील राम-सीता काय म्हणतात?

मंत्री उमा भारती अयोध्येत दाखल
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. पण, नाही म्हणत म्हणत, आज, सकाळी उमा भारती अयोध्येत दाखल झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु, रामजन्मभूमी न्यासच्या वरिष्ठांनी आग्रह केल्यानंतर आपण अयोध्येत आल्याचं उमा भारती यांनी सांगितलंय. 

भाजपचे बडे नेते बाजुलाच
राम मंदिराच्या मुद्द्यानंतरच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला देशभरात प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा करून चळवळ उभी केली आहे. त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंह, लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी हे त्यावेळचे तिन्ही महत्त्वाचे नेते आजच्या भूमीपूजन सोहळ्यापासून दूर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन नेत्यांना सोहळ्यापासून लांब ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात असलं तरी, अडवानी आणि जोशी यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

आणखी वाचा - आता लक्ष मथुरा-काशीकडे : विनय कटियार

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?
राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसकडून कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय झालेल्या प्रियंका गांधी यांनी राम मंदिरविषयी प्रतिक्रिया दिली. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. तुमच्या आमच्यात आहेत. मला आशा आहे की, राम मंदिराचा हा भूमीपूजन सोहळा देशात राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि एकतेची नवी सुरुवात करेल, असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलंय. 

Ayodhya Ram Mandir

loading image