

Champat Rai Declares Accounts
esakal
Ayodhya Ram Lalla Income: अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांचा अपहार झाल्याचं प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. त्यातच आता गेल्या काही वर्षांत रामललाला नक्की किती दान मिळाले, असा मोठा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिराचं उत्पन्न, खर्च आणि एकूण मिळालेल्या दानाचा संपूर्ण तपशील शनिवारी माध्यमांसमोर जाहीर केला.