esakal | राम मंदिराला देणगी देणाऱ्यांसाठी सरकारकडून 'ही' खास सूट
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya Ram Mandir put under Section 80G of IT Act donations to temple trust exempted from income tax

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी दिल्यास प्राप्तिकरात सूट मिळणार आहे.

राम मंदिराला देणगी देणाऱ्यांसाठी सरकारकडून 'ही' खास सूट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्‍या प्रतिबंधासाठी देशभर लॉकडाउन जाहीर केल्याने अयोध्येतील राम मंदिराचे काम थांबले होते. मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्‍प्यात काही नियम शिथिल केल्याने मंदिर उभारणीच्या दृष्टिने तयारी सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देणगीदारांना प्राप्तिकरात सूट
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी दिल्यास प्राप्तिकरात सूट मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. ही सूट श्रीराम तीर्थक्षेत्र ट्रस्टला दान केलेल्या रकमेवरच मिळणार आहे. प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० जी नुसार ही सूट असेल. मात्र या तरतुदीचा लाभ घेणाऱ्या करदात्यांकडे ट्रस्टकडून दिली जाणारी देणगीची पावती असणे अनिवार्य आहे. ट्रस्टचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक, देणगीदाराचे नाव व देणगीची रक्कम याची माहिती पावतीवर असणे आवश्‍यक आहे.

भीषण : ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू

अशी आहे अधिसूचना
१) कलम ८० जी च्या अंतर्गत सर्व धार्मिक ट्रस्टसाठी सूट दिली जात नाही.
२) धार्मिक ट्रस्टने कलम ११ व १२ नुसार प्राप्तिकरातून सूट मिळण्यासाठी नोंदणी आवश्‍यक. यासाठी ट्रस्टने अर्ज करणे अपेक्षित.
३) नोंदणीनंतर कलम ८० जी नुसार प्राप्तिकरातून सूट देण्यास परवानगी

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर अखेर ईडीची टाच

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप असल्याने साफसफाईची कामे धीम्या गतीने सुरु आहेत. लोखंडाच्या पाइपचे अडथळे, लोखंडाच्या जाळ्या, अस्थायी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या छावण्या हटवून जमीन सपाटीकरणाला सुरुवात झाली असून कोरोनाचे संकट टळल्यावर कामाला वेग येईल आणि लवकरच राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर साकार होईल. - कमलनाथ, महंत नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी