Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Yoga Center Ayodhya : अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एका योग केंद्रात QR कोड असलेली रहस्यमय पेटी आढळल्याने चढाव्यातील काळाबाजार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांना नवे बळ मिळाले आहे.
Ayodhya Ram Mandir Theft

Ayodhya Ram Mandir Theft

esakal

Updated on

Ram Mandir Donation Theft : राम मंदिरातील चोरी प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून मुख्य आरोपी अविनाश शुक्ल याच्याशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अविनाश शुक्ल हा त्याचा भाऊ अभिषेक याच्यासोबत कौशलपुरी येथील एका प्रतिष्ठित योग केंद्रात वास्तव्यास होता. या योग केंद्रात तपासादरम्यान पोलिसांना एक रहस्यमय पेटी आढळून आली असून त्यावर 'राम राज्य कोश', 'राम राज्य प्रशासन' अशी नोंद आणि पेटीएमचा QR कोड लावलेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com