Ayodhya Verdict : कार सेवा म्हणजे काय? कोठून आला शब्द?

टीम ई-सकाळ
Sunday, 10 November 2019

मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे.

पुणे : सध्या कारसेवा हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही. पण, 1992मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते. आता ही कारसेवा म्हणजे काय? कोण होते हे कारसेवक? कोणी केली ही कारसेवा? का केली कारसेवा? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत.

- ढगांच्या अडथळ्यानंतर 'अंबाबाई किरणोत्सव' दुसऱ्या दिवशी यशस्वी; फोटो पाहिलेत का?

कारसेवा म्हणजे काय? 

मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, असा त्याचा अर्थ आहे. इंग्रजीत हा शब्द Volunteer असा आहे. 

- Ayodhya Verdict : राम मंदिराचे पुरावे शोधणारा 'मुस्लिम' हीरो...

कधी वापरला शब्द? 

कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरुंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे. ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते.

- Ayodhya Verdict : निकाल देणाऱ्या घटनापीठातील 'हे' आहेत मराठी न्यायमूर्ती

रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya Verdict What is KarSeva and Where did the word come from