esakal | सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती लाभो! बाबा रामदेव यांचा यज्ञ
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput,baba ramdev

सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी भावना बाबा रामदेव यांनी व्यक्त केली आहे. सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिनी यज्ञ घालून प्रार्थना केली. 

सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती लाभो! बाबा रामदेव यांचा यज्ञ

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: योग गुरु बाबा रामदेव यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी यज्ञ घातला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच दु:ख थरकाप निर्माण करणारे वाटते. याप्रकरणात न्याय मिळावा, अशी भावना बाबा रामदेव यांनी व्यक्त केली आहे. सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिनी यज्ञ घालून प्रार्थना केली. 

बाबा रामदेव म्हणाले की,  दिवंगत सुशांत सिंह राजपूतची बहिण आणि कुटुंबियांशी बोललो. त्यांच दु:ख भयावह आहे. पतंजली योग पीठाच्या माध्यमातून आम्ही सुशांतसाठी प्रार्थना केली. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वांना न्याय मिळावा यासाठीच आपण स्वतंत्र्य मिळवले. सुशांतला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला, असेही रामदेव बाबांनी यावेळी सांगितले.  

सुशांत आणि बॉलिवूडच्या इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळताना दिसत आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पटनामध्ये दाखल तक्रारीमध्ये सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबईत घडलेल्या घटनेचा बिहारमधील पटनामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही राज्यांतील सरकार आणि पोलिसही आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात व्हावा, अशी मागणीही जोर धरत आहे. सर्वोच्च न्यायालयात यांसदर्भात सुनावणी सुरु असून न्यायालय या प्रकरणात काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.