
अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतर देशभरातून विरोध व्यक्त केला जात आहे. योगगुरु रामदेव बाबा यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे. यामुळे भारतातील अनेक उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रामदेव बाबा म्हणाले की, भारतीय नागरिकांनी अमेरिकेनं लावलेल्या ५० टक्के टॅरिफचा विरोध केला पाहिजे. अमेरिकेची ही राजकीय गुंडगिरी आणि हुकुमशाही आहे.