esakal | बॅटमिंटनपटू साईना नेहवाल राजकारणात; या पक्षात केला प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

badminton player saina nehwal joins bjp new delhi

बॅटमिंटनचं कोर्ट गाजवलेल्या साईना नेहवालनं आता राजकारणाचं व्यासपीठ गाजवण्याचा निर्णय घेतलाय. आज तिनं भाजपमध्ये प्रवेश केला.

बॅटमिंटनपटू साईना नेहवाल राजकारणात; या पक्षात केला प्रवेश

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅटमिंटनपटू साईन नेहवालनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. मूळची हरियाणाची असलेली साईनाने भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.साईनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिनंही भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपमध्ये प्रवेश निश्चित
बॅटमिंटनचं कोर्ट गाजवलेल्या साईना नेहवालनं आता राजकारणाचं व्यासपीठ गाजवण्याचा निर्णय घेतलाय. आज तिनं भाजपमध्ये प्रवेश केला. आज, दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात तिचा पक्षप्रवेश झाला. मुळात यापूर्वीही अनेक क्रीडा पटूंनी विशेषतः उत्तर भारतातील क्रीडा पटूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर, कुस्ती पटू योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांचा समावेश आहे. बॅटमिंटन क्षेत्रात साईना नेहवाल हे खूप मोठं नाव आहे. त्यामुळं साईन भाजपचा चेहरा होऊ शकते. साईनानं आज पक्ष प्रवेश केल्यानं, दिल्ली विधानसभा निवडणुकीतही ती प्रचारासाठी उतरू शकते.

आणखी वाचा - मनसेचा एकमवे आमदार अजित पवारांच्या भेटीला

साईनची कारकिर्द
साईना नेहवालनं भारतीय बॅटमिंटनला वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाचा वाटा उचलला. बॅडमिंटनमध्ये भारतातून काही मोजकीच नावं पुढं आली असताना तिनं, या क्षेत्रात स्वतःची छाप पाडली. 2015मध्ये साईनाला जगातील पहिल्या क्रमांकाची बॅटमिंटनपटू म्हणून, रँकिंग मिळालं होतं. हे स्थान प्राप्त करणारी साईना पहिली महिला बॅटमिंटनपटू आहे. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांमध्ये तीन गोल्ड, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत एक सिल्वर, एक ब्रॉन्स आणि लंडन ऑलिम्पिकध्ये तिनं ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं.