Bageshwar Dham : अनिंसने आव्हान दिलेले बागेश्वर धाम महाराज म्हणे रावणाशी फोनवर बोलले होते, पहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham

Bageshwar Dham : अनिंसने आव्हान दिलेले बागेश्वर धाम महाराज म्हणे रावणाशी फोनवर बोलले होते, पहा Video

Bageshwar Dham : बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या किर्तन आणि प्रवचनातून अनेक प्रसंग आणि कथा सांगत असतात पण सध्या त्यांनी सांगितलेला एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या प्रसंगाविषयी बोलताना ते म्हणाले की त्यांची एकदा रावणासोबत फोनवर बातचीत झाली होती. सध्या त्यांचा हा किस्सा सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri video went viral on social media)

बाबांची रावणासोबत काय बातचीत झाली?

बागेश्वर धाम सरकारचे महाराज व्हिडीओत एका ठिकाणी प्रवचन करताना दिसत आहे. या प्रवचनादरम्यान ते रावणासोबतच्या त्यांच्या बातचीतचा किस्सा सांगताहेत. ते म्हणतात, 'एकदा आमची रावणासोबत फोनवर बातचीत झाली. आता नंबर काय होता, हे विचारू नका, झाली म्हणजे झाली. आम्ही त्यांना विचारलं की दशानन जी, माय डियर कसे आहात? ते म्हणाले हॅलो...बागेश्वारवाले बोलत आहात का? आम्ही म्हणालो, हो. "

"पुढे त्याना विचारलं तुम्ही कसे आहात. आम्ही बुंदेली मध्ये एकमेकांशी बातचीत केली. रावण म्हणाला, "ठिक आहे भाऊ. " जेव्हा आवाज कर्कश यायला लागला तेव्हा आम्ही रावणाला विचारले की भाऊ तुम्ही दहा तोंडाने बोलत आहात का? नऊ तोंडाला लॉक करा आणि एका तोंडाने बोला.."

पुढे ही त्यांची अशीच बातचीत सुरू असते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

याशिवाय बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याजवळ अनेक शक्ती सिद्धी आहे, असं म्हटल्या जाते आणि याच कारणामुळे ते अनेकदा चर्चेतही आले. सध्या रावणासोबतच्या त्यांच्या बातचीतमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तर यावर अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिले.

जर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने त्यांची सिद्धी, शक्ती किंवा चमत्कार भर सभेत दाखवले तर त्यांना अंनिस तीस लाख रुपये देतील तर यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीला बागेश्वर धामला आंमत्रित केले आहे. शिवाय त्यांच्या जाण्या येण्याची तिकीटसुद्धा ते भरतील असेही ते म्हणाले.

टॅग्स :viralVideoviral video