अहमदाबादमध्ये उघड्यावर नॉन-व्हेज पदार्थांच्या विक्रीवर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non-Veg-Food

अहमदाबादमध्ये उघड्यावर नॉन-व्हेज पदार्थांच्या विक्रीवर बंदी

गुजरात: अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, महानगर पालिकेने मंगळवारपासून सार्वजनिक रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सार्वजनिक रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, याअंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात या वस्तूंची विक्री करता येणार नाही. अहमदाबाद महापालिकेच्या नगर नियोजन समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती वरिष्ठ नगर नियोजन अधिकारी देवांग दाणी यांनी दिली आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीर: दोन दहशतवाद्यांसह तिघे ठार

शहरातील अनेक ठिकाणी असे स्टॉल्स आहेत, ज्यावर उघड्यावर विक्री केली जाते. त्यावर अनेक नागरिकांनी आक्षेप घेत तक्रारी केल्या होत्या. शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर मांसाहारी पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्याने समितीच्या बैठकीत त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दाणी यांनी सांगितले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारला लोकांच्या खाण्याच्या सवयींबाबत कोणतीही अडचण नाही. मात्र, 'अस्वच्छ' खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर किंवा शहरातील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.

हेही वाचा: दोन विद्यार्थी संघटनांत ‘जेएनयू’मध्ये हाणामारी

दरम्यान, महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयावरून सर्वत्र चर्चा होते आहे. शहरातील काही भागांतील लोकांमध्ये या निर्णामुळे नाराजीचे वातावरण असून, त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top