Karnataka Assembly Elections : सर्वच पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रियेला वेग ; इच्छुकांचे जोरदार लॉबिंग

Breaking Marathi News: आता लक्ष उमेदवार निवड यादींकडे
Karnataka Assembly Elections
Karnataka Assembly Electionssakal

बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील कॉंग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून औत्सुक्य वाढले आहे.

कॉंग्रेस, भाजप व धजद या प्रमुख पक्षांचा सभा, मेळावे जवळपास बंद झाले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आता उमेदवार निवडीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

कॉंग्रेस आणि धजदने यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. दरम्यान, सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काहींनी बंगळूर व दिल्ली गाठली असून जोरदार लॉबिंग सुरू आहे. (Latest Marathi News)

Karnataka Assembly Elections
Karnataka Assembly Elections : कर्नाटकातील सर्व जागा आम आदमी पक्ष लढणार

गुजरात मॉडेलमुळे भाजपात चिंता

सत्ताधारी भाजप उमेदवार निवडीत पिछाडीवर आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. हायकमांड स्तरावर सर्व्हेक्षण झाले असले तरी उमेदवार निवडीबाबत नेत्यांच्या बैठका पूर्ण झालेल्या नाहीत.

उमेदवार निवडताना भाजप गुजरात पॅटर्नचा अवलंब करण्याची शक्यात आहे. त्यानुसार अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विजयासाठीचे निकष आणि सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजप उमेदवारांची निवड करेल. संभाव्य उमेदवारांची यादी आधीच तयार आहे. यादी अंतिम करण्याची कसरत आजपासून सुरू झाली आहे. ही यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. त्याला ४-५ दिवसांचा अवधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

दुसऱ्या यादीसाठी काँग्रेसची आज बैठक

काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीसाठी वेग आला आहे. काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक उद्या (ता. ३१) होत आहे. या बैठकीत उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार करून ती हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. काँग्रेसची दुसरी यादी दहा एप्रिलनंतर जाहीर होणार आहे.

Karnataka Assembly Elections
Karnataka Assembly Elections : दिल्ली, पंजाब आता कर्नाटक! अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा!

स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील उपस्थित राहतील.

‘आप’ सर्व २२४ जागा लढविणार आम आदमी पक्षाने (आप) प्रथमच कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’ने सर्व २२४ जागा लढविणार असून उमेदवार यादी मात्र अजून जाहीर केलेली नाही.

धजदची दुसरी यादी लवकरच

काँग्रेस-भाजपच्या आधी ९३ मेदवारांची पहिली यादी जाहीर करून धजदने आघाडी घेतली होती. दुसरी यादी तयार करण्याकडे धजदने लक्ष दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com