बंगळूरुच्या कॅफेत बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस; एनआयएची घोषणा, संशयिताचा फोटो प्रसिद्ध

Bengaluru Rameshwaram cafe blast : बंगळूरु येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) तीव्र केला असून बॉम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, या संदर्भात माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Bengaluru Rameshwaram cafe blast
Bengaluru Rameshwaram cafe blastesakal

Bengaluru Rameshwaram cafe blast : बंगळूरु येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) तीव्र केला असून बॉम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, या संदर्भात माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

एनआयए अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे रामेश्वरम कॅफे बाँबस्फोटाचा तपास व्यापक केला असून आता बॉम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या बॉम्ब ठेवलेल्या संशयिताची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही केली आहे.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Farmers Protest : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील; आंतरराज्य बस स्थानकांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

यापूर्वी सीसीबीने केलेल्या तपासादरम्यान बॉम्ब ठेवलेल्या संशयिताचा मास्क न लावलेला फोटो सापडला होता. आता तो फोटो एनआयएने प्रसिद्ध केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कॅफेला भेट देऊन जागेची पाहणी केली. कॅश काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरा तपासला आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी विविध ३८ नमुन्यांची माहितीही एनआयए अधिकाऱ्यांना दिली आहे.

महत्वाचा धागा हाती

गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पोलिसांना बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी-तीव्रतेच्या बाँबस्फोटाबाबत एक महत्त्वाचा सुगावा मिळाला आहे आणि ते लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील. दोन दिवस तपास करणाऱ्या पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. संशयाच्या आधारे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून माहिती घेत आहेत.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Devendra Fadnavis : शिवसेना, राष्ट्रवादीला खरंच एक आकडी जागा मिळणार का? देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतून स्पष्टीकरण

नाव गुपित ठेवणार

एनआयएने नागरिकांना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती दिसल्यास त्यांनी ताबडतोब ०८०-२९५१०९००, ८९०४२४११०० या दूरध्वनी किंवा मोबाईलवर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com