Devendra Fadnavis : शिवसेना, राष्ट्रवादीला खरंच एक आकडी जागा मिळणार का? देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतून स्पष्टीकरण

BJP Alliance Maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर इतर जागांबाबत सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. जिथे भाजप युतीमध्ये आहे, तिथे भाजपकडून उमेदवाऱ्या मागे ठेवण्यात आलेल्या आहेत.
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
devendra fadnavis eknath shinde ajit pawarEsakal

BJP Alliance Maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर इतर जागांबाबत सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. जिथे भाजप युतीमध्ये आहे, तिथे भाजपकडून उमेदवाऱ्या मागे ठेवण्यात आलेल्या आहेत.

भाजपच्या दिल्लीतील बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मित्र पक्षांच्या एक आकडी उमेदवारीबाबत भाष्य केलं.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Rahul Gandhi: मोदींवर टीका केली तर...; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे इशारावजा दिशानिर्देश?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा मिळताली, अशा बातम्या बुधवारी सकाळीपासूनच काही माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. त्यावरुन फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. मीडियाने स्वतःहून असं ठरवणं आणि धादांत चुकीच्या बातम्या देणं चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
आश्चर्य! शाळेत शिकवायला आली AI शिक्षिका; भारतात केरळमधील शाळेचा खास उपक्रम

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • भाजपने पहिल्या यादीमध्ये ज्या जागा जाहीर केल्या आहेत तिथे भाजप स्वतंत्र आहे. इतर ठिकाणी भाजप अलायन्समध्ये असल्याने त्यावर चर्चा सुरु आहेत. त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल.

  • प्रत्येक राज्यासोबत केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा केली जात आहे. आज महाराष्ट्रातील आम्ही नेते चर्चेसाठी आलेलो असून युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत.

  • मित्र पक्षांना एक डिजिट जागा मिळतील, असं सांगणं म्हणजे पतंगबाजी आहे. अशा प्रकारे बतावण्या करणं योग्य नाही. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com