सार्वजनिक बॅंकांचे कर्मचारी 8 जानेवारीला संपावर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे कर्मचारी 8 जानेवारीला संपावर जाणार आहेत. देशपातळीवर हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील बॅंकिंग व्यवहारांवर 8 जानेवारीला परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे कर्मचारी 8 जानेवारीला संपावर जाणार आहेत. देशपातळीवर हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील बॅंकिंग व्यवहारांवर 8 जानेवारीला परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोदी सरकारच्या अलीकडच्या काळातील बॅंकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि कामगारांसंदर्भातील धोरणे यांच्याविरोधात बॅंक कर्मचारी अखिल भारतीय पातळीवर संपावर जाणार आहेत. संप पुकारणाऱ्या संघटनांचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने या संपाचा आपल्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या कामकाजावर मात्र या संपाचा परिणाम होऊ शकतो. 

Exclusive : सोन्याचा दर 'वाढता वाढता वाढे'; दोन दिवसात 1800 रुपयांनी महागले!

बॅंक ऑफ बडोदा आणि कॅनरा बॅंक यांनी संपामुळे कामकाजावर परिणाम न होता बॅंकेचे कामकाज सुरळीत सुरू राहील, याची काळजी घेण्यात येईल, असे म्हटले आहे. इंडियन बॅंक्‍स असोसिएशनने (आयबीए) बॅंकांना संपाची माहिती दिली आहे. या संपात इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स कॉंग्रेस आणि बॅंक कर्मचारी सेना महासंघ यांनी हा संप पुकारला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank strike on January 8

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: