Jammu Kashmir : बारामुल्लामध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
Jammu and Kashmir Terrorist Attack
Jammu and Kashmir Terrorist Attackesakal
Summary

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला (Jammu and Kashmir Baramulla) जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी दहशतवादी (Terrorist Attack) आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. बारामुल्ला जिल्ह्यामधील क्रीरी भागातील वानिगाम बाला इथं किमान दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं (Jammu and Kashmir Police) सांगितलं. दरम्यान, चकमकीत 1 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे.

याआधी बुधवारीही जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची (Jammu and Kashmir Security Force) दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपुरामध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, यारीपुरा येथील बरिहार्द काठपुरा भागात 27 जुलै रोजी सकाळी सुरक्षा दल गस्तीवर निघाले होते. यादरम्यान त्यांना परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळं चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला असून दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

Jammu and Kashmir Terrorist Attack
Monkeypox Virus : मंकीपॉक्सचा धोका वाढला; स्पेनमध्ये मृत्यूची पहिली नोंद

यापूर्वी 6 जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरलं आणि त्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं. काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 11 जुलै रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा एक कुख्यात दहशतवादी मारला होता. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता आणि 2018 पासून राज्यात सक्रिय होता.

Jammu and Kashmir Terrorist Attack
Rishi Sunak : ब्रिटनचा पंतप्रधान झालो, तर जनतेला करात देणार सूट; ऋषि सुनक यांची मोठी घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com