Bastar attack : नक्षलवाद संपवण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करणार - अमित शहा

Amit Shah
Amit Shah

छत्तीसगडच्या बस्तर भागात झालेल्या नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत २२ सुरक्षा रक्षक शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी छत्तीसगड दौरा केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी नक्षलवादाचं संकट संपवण्यासाठी नक्षलविरोधी मोहिम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा शहा यांनी यावेळी दिला.  

"उद्धव ठाकरेंनी गमावला सरकार चालवण्याचा नैतिक आधिकार"

बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहा म्हणाले, "नक्षलवादाविरोधातील कारवाई निर्णायक वळणावर पोहोचवल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकांचं बलिदान कायमचं स्मरणात ठेवलं जाईल. मी देशाला अश्वस्त करु इच्छितो की हा लढा आता थांबणार नाही. उलट नक्षलवाद संपवण्यासाठी हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल. या लढ्यात शेवटी आपलाच विजय होणार आहे" दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या काही सुरक्षा रक्षकांची शहा यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शहा यांनी पहिल्यांदाच बस्तर भागात भेट दिली. 

सीआरपीएफ प्रमुखांवर राहुल गांधींची टीका

दरम्यान, "नक्षलविरोधी मोहिमेत सुमारे ३० नक्षलवादी मारले गेल्याने हे आपल्या नक्षलविरोधी मोहिमेचे अपयश नाही," या सीआरपीएफ प्रमुखांच्या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल म्हणाले, "जर हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश नाही तर या चकमकीतील मृत्यूचं प्रमाणं हे १:१ कसं? म्हणजेच ही अत्यंत वाईट पद्धतीची आणि नाकर्तेपणानं राबवलेली मोहिम आहे. आपले जवान हे काही शहीद होण्यासाठीचे तोफ गोळे नाहीत," असं राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. 

छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जोनागुडा, टेकालगुडा या गावांमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आपले २२ जवान शहीद झाले तर ३१ जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com