
हद्दच केली सरपंचाने! सामूदायिक शौचालयात अजुबाजुलाच बसवले दोन टॉयलेट सीट; खर्च १० लाख
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात सरपंचासह प्रशाकीय अधिकाऱ्यांनी अस काम केलं की, सोशल मीडियावर त्यांच्या कारनाम्याचीच चर्चा आहे. टाऊनशिपमधील विकास विभागाने एकाच खोलीत दोन टॉयलेट सीट लावल्या आहेत. एवढेच नाही तर या कक्षाला एकही दरवाजा बसविण्यात आलेला नाही. याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा: सायकलपोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या मुलीचा मृत्यू; डॉक्टरांनी इंजेक्शन देताच...
बस्ती मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या कुदरहा ब्लॉक परिसरातील गौराधुंधा गावात सरपंच आणि ग्रामसेवकाने एकाच खोलीत दोन टॉयलेट सीट बसवल्या आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की असं कसकाय होऊ शकतं? पण हे काम टाऊनशिपमधील एका सरपंचाने आणि सचिवाने केले आहे. या सामुदायिक शौचालयाबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
हेही वाचा: Coronavirus: "कोरोना उद्रेकाच्या बातम्या कोणीतरी पेरतंय"; तानाजी सावंतांना नेमकं म्हणायचंय काय?
मीडिया रिपोर्टनुसार, हे कम्युनिटी टॉयलेट 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. एकाच खोलीत दोन टॉयलेट सीट्स बसवल्यामुळे आणि त्यासोबत या खोलीत एकही दरवाजा बसवण्यात आला नसल्याने अशा कम्युनिटी टॉयलेटचा वापर कोणालाच करता येणार नाही. या टू सीट कम्युनिटी टॉयलेटवर जेईएमआय राजेश गुप्ता, बीडीओ संजय नाथ, सरपंच विंदू देवी, सचिव पूनम श्रीवास्तव यांची नावे लिहिण्यात आली होती.