

High alert for heavy rain in 10 states and 3 union territories.
Sakal
बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या भीषण चक्रीवादळाचा प्रत्यक्ष परिणाम आता दिसू लागला आहे. सोमवार पासून देशातील हवामान अधिकच रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार समुद्रात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून वाऱ्याचा हा वेग ताशी १०० किलोमीटरच्या घरात पोहोचण्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळी प्रणालीमुळे उद्या देशातील १० राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.