

Bay of Bengal low pressure area IMD weather forecast maharashtra
esakal
Maharashtra weather forecast : महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, बहुतांश ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. दरम्यान, (ता. १८) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील काळात पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या दिशेने सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात पुढील काही दिवसांत पावसाच्या सरींची शक्यता आहे.