

Monsoon likely to become active again in India
esakal
Monsoon News India : देशभरात सक्रिय झालेला मॉन्सून अचानक थांबल्याने अनेकांना आशा लागून राहिली होती. दरम्यान पुढच्या तीन दिवसात पावसाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत मॉन्सून वाऱ्याचा वेग वाढत असून अनेक राज्यांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानातही घट होणार आहे.