BBC IT Raid : बीबीसी म्हणजे 'भ्रष्टाचार बकवास कॉर्पोरेशन'; भाजपचा आक्रमक पावित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

BBC IT Raid : बीबीसी म्हणजे 'भ्रष्टाचार बकवास कॉर्पोरेशन'; भाजपचा आक्रमक पावित्रा

नवी दिल्ली – बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांवर काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारख्या विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर भाजपने पलटवार करत बीबीसीला भारतातील कायद्याचे पालन करावे लागेल, असं म्हटलं आहे. ( BBC IT Raid news in MARATHI)

आयकर विभागाला आपले काम करण्याची परवानगी दिली पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गौरव भाटिया म्हणाले, "बीबीसी ही जगातील सर्वात भ्रष्ट कॉर्पोरेशन बनली आहे. बीबीसीचा प्रचार आणि काँग्रेसचा अजेंडा एकच आहे. बीबीसीला भारताच्या कायद्याचं पालन करावं लागतं, काही चुकीचं झालं नसेल तर भीती वाटण्याचं कारण काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

गौरव भाटिया म्हणाले की, प्राप्तिकर विभागाला आपले काम करू द्यावे. जेणेकरून दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल. गौरव भाटिया यांनी बीबीसीला जगातील सर्वात भ्रष्ट कॉर्पोरेशन म्हटले आहे. बीबीसी ही जगातील सर्वात भ्रष्ट संस्था बनली आहे. बीबीसीचा प्रचार आणि काँग्रेसचा अजेंडा मिळता जुळता आहे, असही भाटिया यांनी नमूद केलं.

गौरव भाटिया पुढं म्हणाले की, बीबीसीचा भारताला कलंकित करण्याचा इतिहास आहे. भारताविरुद्ध द्वेषाच्या भावनेने काम केल्याचा इतिहास बीबीसाचा आहे. खुद्द इंदिरा गांधींनी बीबीसीवर बंदी घातली होती, हे काँग्रेसने लक्षात ठेवायला हवं.

टॅग्स :BjpCongressincome tax