esakal | Coronavirus : घरातच बसा... अवघ्या २० मिनीटात पसरतोय कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

be alert coronavirus spreading in only 20 minutes

कोरोना व्हायरस सध्या जगात झपाट्याने पसरत आहे. भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या ६०६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये काल (ता.२५) केवळ २० मिनिटांत ०४ जणांना व्हायरसची लागण झाली.

Coronavirus : घरातच बसा... अवघ्या २० मिनीटात पसरतोय कोरोना

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस सध्या जगात झपाट्याने पसरत आहे. भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या ६०६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये काल (ता.२५) केवळ २० मिनिटांत ०४ जणांना व्हायरसची लागण झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळच्या कासारगोडमधील येथे एका व्यक्तीमुळे २० मिनिटात ०४ जणांना व्हायरसची लागण झाली आहे. कासरगोडमध्ये कोरोना व्हायरसचा आढळलेला दुसरा रुग्ण ०२ दुबईहून भारतात आला होता. १६ मार्चला त्याला कोरोना व्हायरस असल्याचं निदान झालं. त्याने चाचणीसाठी स्वॅबचा नमुना दिला, त्यानंतर त्याला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी २० मिनिटांमध्येच त्याने तब्बल ०४ जणांना कोरोना संक्रमित केलं. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा त्याचा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आलं आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं सध्या कोरोना हा परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना होत आहे. मात्र जर कोरोनाग्रस्त व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यास, याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं लोकांना घरातच राहण्याचे आवाहन सतत केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे.

वेगाने पसरतोय कोरोना
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीत पहिल्या कोरोना रुग्णानंतर ६४ दिवसांनी ०१ लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र केवळ ११ दिवसात दुसऱ्या टप्प्यात कोरोना पसरला. आता कोरोना इतका झपाट्याने वाढत आहे की, केवळ ०४ दिवसांत ०१ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

loading image