सावधान! व्हिडिओ कॉलमध्ये सेक्स चॅट करताय?, तुमचा बँक बॅलन्स होऊ शकतो झिरो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

frequent calls

सावधान! व्हिडिओ कॉलमध्ये सेक्स चॅट करताय?, तुमचा बँक बॅलन्स होऊ शकतो झिरो

नवी दिल्ली : सायबर ठगांनी आता देशभरात लोकांना लुटायची नवी क्लुप्ती शोधून काढली आहे. यामुळे लोकांना कष्टानं जमवलेला आपला पैसा दोन मिनिटांतच गमवावा लागू शकतो. सध्या सरकारी यंत्रणांनाही अशा प्रकारच्या चोरांचा छडा लावण्यात अडचणी येत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही 'एक्स्टॉर्शन' अर्थात खंडणीचा प्रकार ऐकला असेल पण आता या चोरांनी 'सेक्स्टॉर्शन' हा नवा लुटण्याचा प्रकार सुरु केला आहे.

हेही वाचा: ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

अमेरिका आणि युरोपात अशा सायबर गुन्ह्यांचा ट्रेन्ड सुरु झाला होता. पण आता हा प्रकार भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही पोहोचला आहे. मध्य प्रदेशातील निमच जिल्ह्यात अशा प्रकारचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी यातील गुन्हेगारांना अटकही केली असून आता लोकांना अशा लुटारुंपासून सावध करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे.

सायबर ठगांची अशी आहे गुन्ह्याची पद्धत

सध्याच्या घडीला सेक्स्टॉर्शनद्वारे लोकांना लुटणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. हे लुटारु आधी तुम्हाला सोशल मीडियावर मुलींच्या नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर तुमच्या छळाला सुरुवात होते. यामध्ये ऑनलाईन सेक्स चॅटिंगचा वापर केला जात आहे. या प्रकाराद्वारे अनेकांकडून या ठगांनी लाखो रुपये उकळले आहेत. सुरुवातीला सेक्स चॅटच्या जाळ्यात ओढून तुम्हाला ब्लॅकमेल करुन पैसे उकळले जातात. त्यानंतर पुन्हा पुन्हा पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. यानंतर संबंधित व्यक्ती नैराश्यात जाऊन आत्महत्येचे विचारही करतात.

पीडित व्यक्तींनी सांगितली आपबिती

अनेक पीडितांनी अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. हे सायबर ठग्ज तुम्हाला फेसबुकवरुन फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवतात. जर तुम्ही फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारली तर ती मुलगी तुम्हाला फेसबुकच्या मेसेंजरमध्ये हॅलो असा संदेश पाठवते. तुम्हाला वाटतं की, आपली मैत्री होऊ शकते त्यामुळे तुम्ही या संदेशाला प्रतिसाद देता. त्यानंतर संबंधित मुलीकडून तुमचा व्हॉट्सअॅप क्रमांक मागितला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला ऑनलाईन सेक्सची ऑफर दिली जाते. जर तुम्ही ही ऑफर स्विकारली तर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरुन व्हिडिओ कॉल येतो. यानंतर तुम्हाला कपडे काढण्यास सांगितलं जातं त्याचवेळी हे ठग तुमची फेसबुकची मैत्रिण तुमच्यासोबत व्हिडिओ मेसेंजरमध्ये दिसते. यानंतर तुम्हाला तुमच्या मित्राचा फोन येईल आणि त्याला तुमचा पॉर्न व्हिडिओ दाखवला जाईल, अशी धमकी दिली जाते. जर तुम्ही त्यांच्या या प्रकाराकडं दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला तुमचा व्हिडिओ पाठवतात आणि तुमच्याकडे मोठ्या रक्कमेची मागणी करतात. जर तुम्ही ही रक्कम त्यांना दिली नाहीत तर ते फेसबुकवरील तुमच्या मित्रांना ते पाठवतात. यानंतर तुम्ही मानसिक तणावाखाली येता.

काय खबरदारी घ्याल?

खबरदारीसाठी तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून अथवा मुलीकडून फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्यास ती स्विकारु नका. जर तुम्ही कोणाला ओळखत नसाल तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बालू नका. ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तींशी कधीही पैशांचे व्यवहार करु नका. अशी घटना तुमच्यासोबत घडली तर तातडीने सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार द्या.

loading image
go to top