ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale_ST Bus

ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

मुंबई : ऐकेकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या ब्रँड अँबेसिडर असलेले अभिनेते विक्रम गोखले यांनी सध्याच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य केलं आहे. जगातलं बसचं एक नंबरचं नेटवर्क असलेल्या एसटीची राजकारण्यांनी वाट लावली अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा: "आपला देश भगवाच राहिला पाहिजे; तो कधीही हिरवा होता कामा नये"

गोखले म्हणाले, "मी एकेकाळी एसटी महामंडळाचा ब्रँण्ड अँबेसिडर होतो. त्यावेळी एसटीवर मी बराच अभ्यास केला. एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावरती माझा लेखही प्रसिद्ध झाला होता. त्यावर एवढा अभ्यास एसटी महामंडळातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनीही केलेला नाही, अशा प्रतिक्रिया विद्वान लोकांनी दिल्या होत्या. एसटीला, एअर इंडियाला गाळात घालण्याचं काम राजकीय लोकांनी केलेलं आहे. एअर इंडिया जगातील एकमेव एअरलाईन होती जी ६०,००० कोटी रुपयांच्या फायद्यात होती, ती आता ४०,००० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. त्याचं कारण फक्त राजकीय लोक."

हेही वाचा: मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सूचकपणे समर्थन देताना गोखले म्हणाले, एसटी दारोदारी जाणारी आहे, ती काय कुठली ट्रॅव्हल कंपनी नाही. एसटी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एसटी मागून ताबडतोब मागवून घेतात. एसटी महामंडळासारखी अठरा हजार बसेसची ताकद आहे का कोणाकडे? जगातील एक नंबरची बस यंत्रणा आहे एसटी. एवढं मोठं जाळं विणलेलं असतानाही एसटीची राजकारण्यांनी वाट लावली.

loading image
go to top