Beating Student : राजस्थानमध्ये पुन्हा मारहाण; विद्यार्थी रुग्णालयात तर शिक्षक ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating Student Latest News

Beating Student : राजस्थानमध्ये पुन्हा मारहाण; विद्यार्थी रुग्णालयात तर शिक्षक ताब्यात

Beating Student Latest News बाडमेर : राजस्थानमधील (Rajasthan) जालोर जिल्ह्यात विद्यार्थ्याच्या (Student) मृत्यूचे प्रकरण शांत झाले नाही तोच बारमेर जिल्ह्यातही विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण (Beating) केली. जालोरप्रमाणेच बाडमेरमध्येही मारहाणीचे प्रकरण तापले आहे. या प्रकरणी विविध संघटनांनी निषेध नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

हे प्रकरण बारमेर शहरातील सरकारी शाळेचे आहे. सातवीत शिकणारा मुलगा (Student) शिक्षकाच्या मारहाणीनंतर शाळेतच बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, वर्ग चाचणी दरम्यान मुलाने शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. त्यानंतर संतापलेल्या शिक्षकाने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Fear Of Operation Lotus : केजरीवालांनी बोलावले विशेष अधिवेशन; आमदारांची बैठक

मुलाने मारहाणीचे कारण विचारले असता शिक्षकाने ढकलले. त्यामुळे मुलाच्या डोक्याला व पोटाला दुखापत झाली. याच शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या भावाने शाळेतील इतर शिक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर महिला शिक्षिकेने मुलाला रुग्णालयात नेले. ‘मुलाच्या पोटात आणि डोक्यात दुखत आहे. गंभीर दुखापत नाही. मुलाची प्रकृती ठीक आहे. खबरदारी म्हणून सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी करण्यात येणार आहे’, असे डॉक्टर दिलीप चौधरी यांनी सांगितले.

मारहाणीनंतर शिक्षक लपला

मुलाला मारहाण (Beating) केल्यानंतर शिक्षक कुठेतरी लपला होता. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला शोधून काढले. नंतर ताब्यात घेण्यात आले. आरोपीची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Beating Student Rajasthan Teachers In Custody

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..