Belagav Sugar Factories
esakal
बेळगाव : उत्तर कर्नाटकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, प्रति क्विंटल ३,५०० रुपये दराने उसाचा भाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Karnataka Sugar Industry,) आज साखर कारखाना मालकांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहे. मात्र, कर्नाटकातील बहुतेक साखर कारखाने हे प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या मालकीचे असल्याचे वास्तव आता समोर आले आहे.