BJP Leader Attack Case : मंत्री हेब्बाळकरांचा भाऊ अडचणीत, 'या' प्रकरणात काँग्रेस आमदारासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी कॉंग्रेसच्या विधान परिषद सदस्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
Prithvisingh Attack Case Channaraj Hattiholi
Prithvisingh Attack Case Channaraj Hattiholiesakal
Summary

कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

बेळगाव : भाजपचे पदाधिकारी पृथ्वीसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणात (Prithvisingh Attack Case) विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पृथ्वीसिंग यांच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांकडून हा गुन्हा नोंदविला.

बेळगावात सुवर्ण विधानसौधमध्ये (Suvarna Soudha Belgaum) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी कॉंग्रेसच्या विधान परिषद सदस्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे या घटनेचे राजकीय पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. चन्नराज यांच्यासह सुजित जाधव, सद्दाम व अन्य दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

Prithvisingh Attack Case Channaraj Hattiholi
कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे; शिकार, जनावरांचं मांस फाडण्यासाठी केला जात होता वापर

शहरातील जयनगर येथील पृथ्वीसिंग यांच्या निवासस्थानी ही घटना सोमवारी (ता. ४) घडली होती. पृथ्वीसिंग यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. जागेच्या भाडेकरारावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Prithvisingh Attack Case Channaraj Hattiholi
Bidri Factory Election Result : 'बिद्री'वर पुन्हा 'केपीं'चंच वर्चस्व! मुश्रीफ-बंटी पाटलांच्या साथीनं विरोधकांचा धुव्वा, सर्व 25 जागांवर विजय

सोमवारी (ता. ४) अधिवेशन सुरू असतानाच सायंकाळीच पृथ्वीसिंग यांच्यावर हल्ल्याची घटना घडली. व्हिडिआे व्हायरल करून पृथ्वीसिंग यांनीच या हल्ल्याची माहिती दिली होती. कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन पृथ्वीसिंग यांची भेट घेतली होती. मंगळवारी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही त्यांची भेट घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीएमसी पोलिसांनी चन्नराज यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला, पण याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. चन्नराज हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ते बंधू आहेत.

Prithvisingh Attack Case Channaraj Hattiholi
जातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या 'या' पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या तब्बल 50 हजार प्रती

ध्वनिफीत व्हायरल कोण केली?

भाजपच्या एससी मोर्चाचे राज्य पदाधिकारी असलेल्या पृथ्वीसिंग यांच्याबाबतची आक्षेपार्ह ध्वनिफीत मंगळवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यात पृथ्वीसिंग हे बेळगावच्या एका माजी लोकप्रतिनिधीसोबत बोलत आहेत. त्यांनी बेळगावातील प्रभावी राजकीय व्यक्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य त्यात केले आहे. त्यामुळे आता पृथ्वीसिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. ती ध्वनिफीत कोणी व्हायरल केली, हे अद्याप समोर आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com