

CJI Surya kant
esakal
पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांविरोधात दाखल अपिलांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने ६ ऑक्टोबर रोजी नंदिग्राम आणि राजनगर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांचा संदर्भ देत तातडीची सुनावणी घेण्याची मागणी फेटाळली. या खंडपीठात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश आहे.