भाड्याने घर घ्यायला गेला, घरमालकाने मागितली मार्कशीट, 90% टक्के पेक्षा कमी मार्क पाहून दिला नकार

घरमालक आणि ब्रोकर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 House On Rent
House On RentSakal

House On Rent: तुम्ही कधी ऐकले आहे की घरमालक घर भाड्याने देण्यासाठी भाडेकरूच्या पगाराच्या स्लिप, शाळेचे प्रमाणपत्र आणि लिंक्डइन प्रोफाइल तपासतात? पण, ही गोष्ट बेंगळुरूमध्ये घडली आहे. भाड्याच्या घरांच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने बंगळुरूमध्ये घर भाड्याने देणे कठीण झाले आहे.

12वीच्या परीक्षेत केवळ 75% गुण मिळाल्यामुळे घरमालकाने एका व्यक्तीला घर भाड्याने देण्यास नकार दिला. घरमालकाला असा भाडेकरू ठेवायचा आहे, ज्याला 12वीच्या परीक्षेत 90% टक्के गुण मिळाले आहेत.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, घर भाड्याने देणारी व्यक्ती आणि ब्रोकर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शुभ नावाच्या एका ट्विटर युजरने त्याच्या @kadaipaneeeer या ट्विटर हँडलवर चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केला आणि लिहिले की, "गुण कदाचित तुमचे भविष्य ठरवू शकत नाहीत, पण तुम्हाला बंगळुरूमध्ये फ्लॅट मिळणार की नाही हे ते नक्कीच ठरवतील."

योगेश नावाचा व्यक्ती घर भाड्याने घेण्यासाठी ब्रोकरशी संपर्क साधतो. ब्रोकर त्याला सांगतो की घरमालक घर भाड्याने देण्यास तयार आहे. यानंतर ब्रोकर त्याला आधार कार्ड, जॉब जॉइनिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड आणि 10वी आणि 12वीची मार्कशीट देण्यास सांगताे. याशिवाय, ब्रोकर सांगतो की, घरमालकाने 150-200 शब्दांत स्वतःबद्दल लिहावे अशी इच्छा आहे.

 House On Rent
Mumbai : प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा यामुळे वाघूळ आधुनिक बँकिंगचे निर्माते; अर्थमंत्री निर्मला सीतारामन

योगेश घरमालकाने विचारलेली सर्व माहिती ब्रोकरला पाठवतो. पण काही वेळाने ब्रोकर व्हॉट्सअॅपवर मेसेज करतो, “अरे योगेश! मी तुमची कागदपत्रे घरमालकाला पाठवली. पण माफ करा, त्याने तुमची प्रोफाईल नाकारले कारण तुम्हाला 12वी मध्ये फक्त 75% गुण मिळाले आहेत तर घरमालकाला 90% ची अपेक्षा करत आहे.”

बेंगळुरूमध्ये भाड्याने घर घेणारे लोक घरमालकांनी लादलेल्या अव्यवहार्य अटींमुळे खूप अस्वस्थ आहेत. सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहेत. सौरभ फिरके नावाच्या युजरने ट्विटरवर लिहिले की, "लवकरच बेंगळुरूमधील फ्लॅटसाठी प्रवेश परीक्षा सुरू होईल."

 House On Rent
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com