सेक्स करण्यास नकार दिला; पतीने केली पत्नीची हत्या अन् दिली हरवल्याची तक्रार

crime news
crime news sakal
Updated on

बंगळुरू - बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारचा राहिवासी असलेल्या एका इलेक्ट्रेशियनने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. तसेच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शिराडी डोंगरात फेकून दिल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ लैगिक संबंध नाकारल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचं समजतं.

crime news
'बिल्किस बानो महिला की मुस्लिम हे या देशानं ठरवावं' - महुआ मोइत्रा

पत्नीच्या हत्येच्या आरोपातून वाचण्यासाठी आरोपी पतीने आपली पत्नी बेपत्ता असल्याचा बनाव रचला. तसेच या संदर्भात तक्रार देखील दाखल केली. मिळालेल्या वृत्तानुसार, पृथ्वी राज सिंह या आरोपीचे नाव असून त्याने नऊ महिन्यांपूर्वीच मृत महिलेशी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी पत्नीने तिच्या वयाबद्दल खोटे बोलल्याने तो रागावल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान पत्नीने आपल्यावर असंस्कृत असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच ती शारीरिक संबंध ठेवण्यास कधीही सहमती दर्शवत नव्हती. "लग्नाच्या वेळी तिने आमच्या कुटुंबीयांना सांगितले होते की ती 28 वर्षांची आहे. नंतर आम्हाला समजलं की, ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तिने कधीही सेक्ससाठी सहमती दर्शवली नाही. तसेच ती आम्हाला जंगली संबोधून माझा आणि माझ्या पालकांचा अपमान करायची, असंही आऱोपीने सांगितलं.

crime news
अशा राजकारणाची लाज नाही वाटत का? 'त्या' निर्णयावरून राहुल यांचा मोदींना सवाल

दरम्यान संतापलेल्या पृथ्वी राज सिंह पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने बिहारमधील आपल्या मित्र समीर कुमारला पत्नीला मारण्यासाठी बोलावले. ३ ऑगस्ट रोजी हे दोघे उडपीला गेले, तेथे त्यांनी विवाहितेची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह फेकून दिला. तसेच पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान पतीने पृथ्वीराजने पोलिसांना सांगितले की, ज्योती अनेक वेळा घरातून निघून जायची, त्यानंतर स्वतःच परत यायची. मात्र यावेळी तिचा मोबाईल बंद असल्याने आपण तिचा शोध घेत असल्याचं तो म्हणाला. पोलिसांना पतीवर संशय आला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच, पृथ्वीराजने गुन्हा कबूल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com