

Bengaluru Mass Murder Case: What Police Have Revealed : बेंगळुरूमधून सामूहिक हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजाजीनगर परिसरात एका कॅब चालकाने आपल्या पत्नीची आणि तिच्या माहेरच्या कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. इंदू शेखर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, गुरुवारी रात्री उशिरा या प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपीने सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा