
Bengaluru Mumbai Train
esakal
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बंगळूर आणि मुंबईदरम्यान नवीन सुपरफास्ट रेल्वे मंजूर केली असून, ही ३० वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या घोषणेनुसार लवकरच ही सुपरफास्ट रेल्वे सुरू होईल; प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन विमान आणि बसेससाठी पर्याय बनेल.
बंगळूर-मुंबई या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील वाढत्या प्रवासाच्या गरजा आणि स्थानक क्षमतेत सुधारणा यामुळे ही रेल्वे शक्य झाली; संसदेत आणि सार्वजनिक लेखा समितीत केलेल्या सततच्या प्रयत्नांचे हे फळ आहे.
Bengaluru Mumbai Superfast Train : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बंगळूर आणि मुंबईदरम्यान एक नवीन सुपरफास्ट रेल्वे मंजूर केली आहे, अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिली. या मंजुरीमुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांची ३० वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे.
तेजस्वी यांनी स्पष्ट केले की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, आम्ही लवकरच बंगळूर आणि मुंबईदरम्यान सुपरफास्ट रेल्वे सुरू करणार आहोत. दोन्ही शहरे प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत आणि त्यांच्या स्थानकांवरील क्षमता वाढल्यामुळे हे शक्य झाले आहे.