Misusing Water : बंगळुरूमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य! महापालिकेने काढले 'हे' आदेश

Bengaluru News : बंगळूरु शहरामध्ये पाण्याच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात आलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. मागील तीन दिवसांमध्ये पाणी पुरवठा विभागाने २२ रहिवाशांवर १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Misusing Potable Water
Misusing Potable Wateresakal

Bengaluru News : बंगळूरु शहरामध्ये पाण्याच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात आलेली आहेत. जारमधून मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. मागील तीन दिवसांमध्ये पाणी पुरवठा विभागाने २२ रहिवाशांवर १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सध्या पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने, स्वीमिंग पुलातील पाण्याचा वापर, कार धुणे या सारख्या पाणी वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. यासह इमारत बांधकामे, बगीचा कामे, कारंजे, मॉल्स यामध्ये अनावश्यक पाणी वापराला पायबंद घालण्यात आलेला आहे.

Misusing Potable Water
Lok Sabha 2024: महुआ मोईत्रांना हरवणार 'राजमाता'? भाजपकडून तिकीट मिळालेल्या नेत्या कोण आहेत?

BWSSB अर्थात पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शुक्रवापरपासून बंगळूरु शहरामध्ये पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. रविवारपर्यंत नियमाचं उल्लंघन करणारी २२ प्रकरणं आढळून आलेली आहेत. नागरिकांना जागेवरच १.१ लाखाचा दंड करण्यात आलेला आहे.

पाणी पुरवठा विभगाने आदेशामध्ये म्हटलंय की, बंगळूरुमध्ये सुमारे १.४ कोटी इतकी लोकसंख्या आहे. यात कायमस्वरुपी आणि स्थलांतरित झालेले नागरिक आहेत. सर्वांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणं आवश्यक आहे. वरचेवर तापमानामध्ये वाढ होत आहे आणि पाऊस कमी झाल्याने पाण्याचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळणं गरेजचं आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Misusing Potable Water
RCB vs PBKS IPL 2024 : होम ग्राऊंडच ठरतंय आरसीबीसाठी अडचण, यंदाचा हंगाम तरी ठरणार का अपवाद?

बंगळूरु शहरासाठी पाण्याचा स्त्रोत हा कावेरी नदी, महापालिकेने वेळोवेळी खोदलेल्या बोअरवेल हा आहे. कावेरीतून शहरासाठी १ हजार ४५० एमएलडी पाणी मिळते तर सार्वजनिक बोअरवेलमधून ४०० एमएलडी पाणी मिळते.

शहरामध्ये अति-काँक्रिटीकरण आणि अत्यल्प पाऊस, यामुळे भूगर्भातील पाणीसाठी कमी झाला आहे. बंगळुरुच्या ११० गावांमध्ये भूजलसाठा लक्षणीयरित्या कमी झाला आहे. विशेषतः वरथूर, बेलांदूर, हुडी आणि मराठाहल्ली या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com